श्रावण

आजपासून श्रावण मास सुरु होतोय. सर्वांचीच मने हर्षोउल्हासित करणारा हा महिना अनेक कवितांमधून, गीतांमधून अनेक कविंनी रंगवलेला आहे . . . .
ये रे ये रे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा
हे गाणं कोणी आणि कधी लिहिलंय कोणास ठाऊक? लहानपणी ज्यानं हे पाऊसगाणं म्हटलं नसेल तो लहानच नसावा कधी. एक `पैसा’ हे नाणं चलनातून कधीच बाद झालंय. पण आजची कॉन्व्हेंटमधली मुलंही हे गाणं म्हणत पहिल्या पावसात भिजतात. गुगलवर सर्च मारला तरी हे गाणं वाचायला मिळतं. गाणं एवढं साधं, सरळ सोपं, की भर्रकन् पाठ व्हावं. एकही जोडशब्द नाही की बोजड शब्द नाही. लहानपणच्या पावसाचं दुसरं एक गाणं…
नाच रे मोरा,
आंब्याच्या बनात,
नाच रे मोरा नाच…
हे तर कविता म्हणून बालभारतीच्या पुस्तकातही होतं. बाहेर पाऊस सुरू झाला की त्याच्या लयीत सगळ्या वर्गानं हे गाणं एका सुरात म्हणायचं. मोराचं पहिलं दर्शन झालं होतं ते बालभारतीच्या पुस्तकातच.
भरपूर पाऊस यावा अन् शाळेला सुट्टी मिळावी. रेडिओ बहुदा बालगोपाळांच्या मनातली ही भावना नेमकी ओळखायचा. अगदी शाळेत जातानाच रेडिओवर....
सांग सांग भोलानाथ,
सांग सांग भोलानाथ,
पाऊस पडेल काय
शाळेभोवती तळे साचून,
सुट्टी मिळेल काय ...
हे गाणं लागायचं.
श्रावणात पडणाऱ्या पावसासाठी मराठी कवितेत `रिमझिम’ हा शब्द वापरला गेलाय. कित्येक मराठी गाण्यांतून ही 'रिमझिम’ झरताना दिसते. श्रावण महिना म्हटलं की यमुना नदीच्या किनाऱ्यावर हिरवळीवर खेळणारा बाळकृष्ण आणि त्याचे सवंगडी आठवतातच. नदीला पूर आल्यानंतर या कान्हाला शोधणारी यशोदा गाण्यातून दिसते.
रिमझिम पाऊस पडे सारखा,
यमुनेलाही पूर चढे,
पाणीच पाणी चहूकडे, ग बाई,
गेला मोहन कुणीकडे’
पूर्वी रेडिओवर हे गाणं हमखास लागायचं. गीतकार पी. सावळाराम, संगीतकार वसंत प्रभू आणि लता मंगेशकर ही नावं या गाण्याला चिटकूनच यायची.
हिरवा श्रावण आणि रिमझिम बरसणारा पाऊस हा प्रेमीजनांना साद घालतो. अनामिक हुरहूर लावतो.
झिमझिम झरती श्रावणधारा
धरतीच्या कलशा
प्रियाविण उदास वाटे रात
कवी मधुकर जोशींनी `रिमझिम’ या नेहमीच्या शब्दाऐवजी `झिमझिम’ असा शब्द वापरला आहे. तो वेगळाच नाद उत्पन्न करतो.
पाऊस आणि व्याकुळता हा संबंध फार प्राचीन काळापासून आहे. शंभराहून जास्त वर्षांपूर्वी नाट्य़ाचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी संगीत सौभद्र नाटकासाठी लिहिलेलं हे गीत अजूनही लोकप्रिय आहे.
नभ मेघांनीं आक्रमिलें,
तारांगण सर्वहि झांकुनि गेले
कड कड कड कड शब्द करोनी
लखलखतां सौदामिनी
जातातचि हे नेत्र दिपोनी
अति विरही जन ते व्याकुळ झाले’
नवकवितेच्या आधुनिक काळातले कवी ग्रेस म्हणजे ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या परीने समजून घ्यावेत. बाकी काही असो,
पाऊस कधीचा पडतो,
झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली,
दुःखाच्या मंद सुराने
पेटून कशी उजळेना,
ही शुभ्र फुलांची ज्वाला
ताऱ्यांच्या प्रहरापाशी,
पाऊस असा कोसळला‘
किंवा
ती गेली तेव्हा रिमझिम,
पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे
हा सूर्य सोडवित होता
ही ग्रेसगाणी कोणालाही व्याकूळ करतात.
आषाढ संपून श्रावणमास सुरू होईपर्यंत पावसाचा जोर जरा ओसरू लागलेला असतो. पण त्यानं निसर्गावर हिरवी पोपटी जादू केलेली असते.
श्रावण महिना आणि बालकवींची कविता यांचं युगानुयुगांचं नातं जुळलेलं आहे.
श्रावणमासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरूनी ऊन पडे…
बालभारतीच्या पुस्तकात हे गाणं चिरंजीव झालं आहे. प्रत्येक पिढीचं हे गाणं तोंडपाठ आहे.
सिनेमा आणि पावसाची गाणी ही तर एकमेकांच्या हातात हात गुंफूनच येतात.
श्रावणाची आठवण निघालीय आणि कविवर्य भा. रा. तांबे आठवत नाहीत, असं होतच नाही. त्यांची
पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहूनिया दूर
झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी
कुरणांवर शेतात पसरला गुलाल चौफेरी
हिरवे हिरवे गार शेत हे सुदंर साळीचे
झोके घेती कसे चहुकडे हिरवे गालिचे..’
ही कविता ओठ गुणगुणू लागतातच.
आभाळ भरून कोसळू लागलं की ग. दि. माडगूळकरांनी `वरदक्षिणा’ सिनेमासाठी लिहिलेलं गाणं मनात वाजू लागतं.
घन घन माला नभी दाटल्या,
कोसळती धारा
केकारव करी मोर काननी
उभवून उंच पिसारा’
मल्हार रागात बांधलेलं हे गाणं ऐकूनच जणू मेघांमधला पाऊस धरतीवर बरसत असावा.
यौवनसुलभ भावना व्यक्त करण्यासाठी एखाद्या मुलीनं आधार घ्यावा तो पावसाचाच.
आशा भोसलेंनी गायलेल्या
आज कुणीतरी यावे,
ओळखिचे व्हावे
जशी अचानक या धरणीवर
गर्जत आली वळवाची सर,
तसे तयाने गावे
या गाण्यानं कित्येक नवपरिणीतांना हुरहूर लावली.
रानकवी ना. धों. महानोरांनी लिहिलेली पाऊसगाणी तर अजरामर झालीत.
`जैत रे जैत’ सिनेमासाठी त्यांनी लिहिलेलं
नभं उतरू आलं,
चिंब थरथर वलं,
अंग झिम्माड झालं,
हिरव्या बहरात’
परदेशस्थ मराठी माणसं हे गाणं आयपॉडवर ऐकत आपलं मराठीपण जागवत असतात.
पावसाच्या सोबतीनं ताल धरणारी धम्माल कोळीगीतं तर इतर भाषिकांनाही ताल धरायला लावतायत. कवयित्री शांता शेळकेंनी लिहिलेलं
वादलवारं सुटलं गो,
वाऱ्यानं तुफान उठलं गो
भिरभिर वाऱ्यात,
पावसाच्या माऱ्यात
सजनानं होडीला पान्यात लोटलंय
वादलवारं सुटलं गो…
हे गाणं अजूनही कोणालाही रोमांचीत करतं. शांताबाईंच्या सुंदर गीतांना सुधीर फडकेंनी अप्रतिम चाली लावल्या. त्यांचे सुपुत्र श्रीधर फडके यांनीही नव्याकोऱ्या पध्दतीच्या संगीतरचना करून शांताबाईंची गाणी बसवली. त्यातलं श्रावण महिमा सांगणारं हे गाणं –
ऋतु हिरवा, ऋतु बरवा,
पाचूचा वनि रुजवा
युग विरही हृदयांवर
सरसरतो मधु शिरवा,
ऋतु हिरवा’
शांता शेळकेंनी पावसावर प्रेमगीतं लिहिली, कोळीगीतं लिहिली, तशीच बालगीतंही लिहिली.
असंच एक गोड गाणं त्या काळातल्या बालगायिका सुषमा श्रेष्ठ हिच्या आवाजात संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबध्द केलंय.
पाऊस आला, वारा आला,
पान लागले नाचू
थेंब टपोरे गोरे गोरे,
भर भर गारा वेचू’
आपल्या पिढीला मंगेश पाडगांवकरांच्या गीतांनी भुरळ घातली. नुसतीच भुरळ घातली नाही तर जीवनाचा आस्वाद घेण्याची दृष्टीही दिली. त्याचं अरुण दातेंनी गायलेलं ,
भेट तुझी माझी स्मरते
अजून त्या दिसाची
धुंद वादळाची होती
रात्र पावसाची
हे गाणं पाऊस आला की अजूनही आपोआप ओठांवर येतं.
मुंबईतल्या गर्दीत अन् लोकलच्या खडखडाटात कसला आलाय श्रावण, असं तुम्ही म्हणाल. पण पाडगावकर तुमची विकेट घेतील.
श्रावणात घन निळा बरसला
रिमझिम रेशिमधारा
उलगडला झाडांतुन
अवचित हिरवा मोरपिसारा ..
हे अतिव सुंदर गीत त्यांनी याच धावपळीत लोकलमध्ये जाता येता लिहिलंय.
कॉलेजवयात आरती प्रभूंचं आकर्षण वाटू लागलं ते त्यांच्या पाऊसगाण्यांमुळंच.
ये रे घना, ये रे घना,
न्हाऊ घाल माझ्या मना’
पावसाचा अन् मनभावन श्रावणाचा हा गंध मनात असाच दरवळत राहावा. त्याच्या पोपटी कोवळ्या रुपाचा तजेला तनमनाला उल्हसित करीत राहावा. बस्स!
-----------------------------------------------------------------------------------
आणखी काय हवं? आम्ही गीरनारला उन्हाळ्यात सुध्दा हे अनुभवतो ....ही वेगळी गोष्ट .. आणि पावसाळ्यात गिरनार करणे म्हणजे एक आगळी वेगळी मज्जा आणि एक वेगळीच अनुभूती!
-----------------------------------------------------------------------------------
‪#‎whatsapp‬ ‪#‎forwarded‬

शिक्षणाच्या...

अब्राहम लिंकन च्या प्रेरणेने
हंबीरराव रताळे - पाटलांचे त्यांच्या नातवाच्या मास्तरांना पत्र...


"मास्तर...!


आजपासून आमचा नातू
तुमच्या वर्गात बसणार हाय..!
त्यो घरी बसला काय
आन् तुमच्या वर्गात बसला काय,
आमाला दोनीपण सारकंच..!

पर त्यो घरी बसला तर तुमचा संसार कसा काय चालणार?
म्हून त्याला तितं
बसाया पाठूतो...!

तर सर्वात पैली गोष्ट म्हंजी - काय बी कम्प्लेट आली नाई पायजेल.

शाळंच्या पुस्तकात आसतं ते त्याला कुणीबी शिकवंल.
जे पुस्तकात न्हाय,
ते त्याला आलं पायजेल.

मानसानं आयुष्यात जोडधंदा केला पाह्यजे,
हे त्याला सांगा.
मंजी येक फेल गेलं तं दुसरं कामाला येतं.
साखर कारखाना तोटय़ात गेला तं हाताशी ब्यॅंक, पतपेढी पाह्यजे.

तुमी कसं, शाळेत शिकवता, शिकवण्या घेता,
एलायशीच्या पॉलिशा इकता आन् घरी पिको फाॅल बी करता, तसं..!

त्येला पैशाचं म्हत्व सांगा. पैसा गाठीशी बांधताना माणूस रंगांधळा झाला पाह्यजेल.
म्हंजी काळा काय आन् पांढरा काय, दोनी सारकंच ! पैशा - पैशामधी भेदभाव नको.

त्येला सांगा, शिक्शन घेण्यापेक्षा शिक्शन देणं हे मोठं हाय.
शिक्शन घेऊन फक्त घेणारा शाना होतो.
देल्यानं समाज शाना हुतो.

त्येला परीक्षेची आयड़या समजाऊन सांगा.
कोणत्या सेंटरवर परीक्षा दिली तं बिनभोबाट नक्कल करता यील,
त्येची म्हाईती कशी काढाची, पेपर तपासायला कुणाकडं गेले,
तपासणाऱ्याचा रेट काय,
रेट नसंल तं त्याचे नट-बोल्ट कसे कसाचे,
हे समदं जनरल नालेज कुठनं मिळवायचं,
ह्येचे त्येला धडे द्या.

त्येला सांगा- जगात दोन टाईपची माणसं अस्त्यात. जगातली मोठी मोठी बूकं वाचून हुषार होणारे आन् अशा हुषार माणसांना आपल्या पदरी ठिवणारे.

माणसानं हुषार होण्यापेक्षा हुषारांना पदरी ठिवणारं व्हावं!

त्येला ह्या देशाईषयी सांगा. त्येला सांगा- हा देश महान हाय,
पर तू त्येचा फार इचार करू नगंस.
तू इचार केल्यानं काय देश आणखी महान होणार न्हाय. देशाला महान म्हणणं ही बी एक फॅशन आसती;
तवा त्यात फार येळ घालवू नगंस..!!

त्येला शिकवा,
का जगण्याची रीत काय आसती..
लोकशाही काय आसती.
जास्तीत जास्त लोक ज्येच्या बाजूनं उभं ऱ्हात्यात ती गोष्ट चांगली,
आसं लोकशाही सांगते.

पण या लोकांना जुलमानं, जबरीनं उभं केलं, का ते सोताच उभे राह्यले, ह्ये तपासण्याच्या फंदात लोकशाही कदीच पडत न्हाय.
तिनं पडू बी न्हाय !

रस्त्यात सापडलेल्या रुपयापेक्षा म्हेणतीनं कमावलेलं धा पैसं मोठं आसत्यात,
आसलं काही त्याला शिकवू नगंसा.
धा पैसं कमावलं आन् रुपया सापडला तर आपली टोटल वाढते,
ह्ये त्येच्या लक्षात आणून द्या.

रस्त्यात रुपया सापडला ह्येचा आर्थ त्यो निट बगून चालतो.
त्येचं त्येला हे फळं मिळालं, आसं समजवा!

माझा नातू ईतभर हाय
आन् तुमाला मी हातभर गोष्टी सांगतूया,
आसं तुमाला वाटलं,
पर माणूस ईतभर आसल्यापासूनच त्येच्या कानावर हिताच्या गोष्टी बी पडल्या पायजेल.
तो हातभर झाला की हाताभाईर जातो.
तवा हे समदं ध्यानात ठिवा.

माजा नातू तसा हुशार हाय.
त्यो तुमच्यावर ध्यान ठेवणार हायेच.
तुमीबी त्येच्यावर ध्यान ठेवा.
आता येतो..!!"


तुमचाच -
हंबीरराव रताळे - पाटील ...!

टिळक : शिक्षण हक्क आणि अधिकार

ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांना शिक्षणापासून वंचित ठेवले, हा मुद्दा खोडून काढतांना लोकमान्य टिळक आपल्या अग्रलेखात म्हणतात ..... एकाने विद्या, तर दुसर्‍याने द्रव्य पसंत केले ! `प्रत्येक जातीने आपापले हित दक्षतेने पहाणे व त्याकरिता योग्य ती चळवळ करणे जरूर असले, तरी अखिल हिंदी जनतेचा `ब्राह्मण व ब्राह्मणेतर' असा स्थूल विभाग करून जे केवळ ब्राह्मणद्वेषाचे अवास्तविक स्वरूप या वादास देण्यात येत आहे, ते दुष्ट बुद्धीचे आहे. कायदे कौन्सिलातील सर्व जागा किंवा बहुतेक जागा आपणासच असाव्यात, असा हक्क ब्राह्मणांनी पूर्वी केव्हाही सांगितलेला नाही व पुढेही सांगू इच्छित नाहीत. त्यांच्या वाट्याला प्रत्यक्ष व्यवहारात लोकसंख्येच्या प्रमाणाबाहेर जागा पडत असल्या, तर ते त्यांच्या जातिमूलक आग्रहाचे फळ नसून त्यांच्या शिक्षणाचे फळ आहे, ही गोष्ट नाकबूल करणे म्हणजे निवळ आडरानांत शिरणे होय. ब्राह्मणांनी पूर्वी इतर जातींना शिक्षणाच्या बाबतीत मुद्दाम मागे टाकले किंवा दडपून ठेवले हा आरोप सर्वस्वी खोटा आहे. व्यावहारिक शिक्षण व त्याला लागणारी साक्षरता ही क्षत्रिय व वैश्य यांनाच काय, पण शूद्रांनाही खुली होती. पुराण, इतिहास वगैरे वाचण्याचा त्यांचा अधिकार कोणी कधीही काढून घेतला नव्हता. तात्पर्य, वेदाध्यापनाचा तेवढा अधिकार केवळ ब्राह्मणांसच असला, तरी ज्याला हल्ली आम्ही शिक्षण म्हणतो ते कोणत्याही वर्णाला सुलभ होते; म्हणून ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांना शिक्षणरहित ठेवले, या म्हणण्यास काहीच आधार नाही. असे असता शिक्षणाकडे इतर वर्णांनी द्यावे तितके लक्ष दिले नाही. याचे खरे कारण त्यांनी आपापल्या धंद्याकडे विशेष लक्ष दिले व शिक्षणाकडे दुर्लक्ष केले; कारण नुसत्या पुस्तकी कृति दिसण्याला त्या वेळी मान मुळीच नव्हता, हेच होय. आपापल्या धंद्याकडे लक्ष देण्यापासून इतर वर्णांचा आर्थिकदृष्ट्या फार फायदा झाला व ब्राह्मण भेटले की, ते निर्धन व ब्राह्मणेतर म्हटले की ते सधन असा जो सामान्य भेद दिसतो तो त्यामुळेच उत्पन्न झाला आहे. पण या स्थितीस अनुलक्षून `आम्हाला द्रव्योत्पादक धंदा इतर वर्णांनी करू दिला नाही', असे जर ब्राह्मण म्हणतील, तर ती जशी त्यांची चूक होईल तशीच `आम्हांला ब्राह्मणांनी सुशिक्षित होऊ दिले नाही', असे ब्राह्मणेतरांनी म्हणणे हीही चूकच आहे. एकाने द्रव्योत्पादक शिक्षण व द्रव्य पसंत केले. दुसर्‍याने पुस्तकी विद्या व निर्धनत्व पसंत केले, अशी केवळ आपखुषीने पूर्वी वाटणी झाली. याबद्दल परस्परदोष कोणासच लावता येणार नाही.'
- सर्व श्रेय मूळ लेखकांचे

वयात येताना


संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहीली.ती ज्ञानेश्वरी की जी भगवद् गीतेवर टीका आहे.

तुकोबारायांनी देखील वय वर्ष १४-१५ च्या आसपास किंवा त्याही आधी पहिला अभंग रचला असावा.

समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक जेव्हा त्या काळातील समाजाच्या कानांवर पडायला सुरवात झाली तेव्हा त्यांचे वय १० पेक्षाही कमी होते.

जिजाऊंनी श्री राम, कृष्णाच्या कथा सांगत घडवलेले शिवप्रभु शिवराय यांचे वय होते अवघे १४ जेव्हा त्यांनी शिवपिंडीवर स्वता:च्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेतली.
तर.. शंभु बाळांनी शास्त्र आणि क्षस्राच्या संस्कारात भिजत "बुधभुषण" नामक ग्रंथ लिहीला तो देखील वयाच्या 16 व्या वर्षीच.
अशी कैक उदाहरणं आहेत आपल्याकडे. अगदी विष्णुगूप्त चाणक्य पासुन ते स्वामी विवेकानंद, बाळगंगाधर टिळक, सावरकरां पर्यन्त.
ह्या सगळ्यां संत पुरूषांमध्ये समान धागा हाच कि हे सगळे, धर्म आणि मातृभुमी वरील अफाट प्रेमाने झपाटलेले होते. ह्या सगळ्यांमधे प्रचंड उर्जा होती ती समाजाच्या कल्याणाची, प्रगतीची,  स्वता:च्या अध्यात्मिक उन्नतीची.
आम्हाला आता ज्या वयात "होशील का माझ्या पोराची आई" सुचतय ना, त्याच वयात ती पिढी लिहित होती..
इस कदर वाकिफ है,
मेरी कलम मेरे जज्बातोसे ।
मै इश्क लिखना भी चाहू,
तो भी इन्कलाब लिखा जाता है ।।
एकीकडे एैन तारूण्यात असं लिहिणारे भगतसिंग तर दुसरीकडे "तुझ्याशिवाय करमेना" अशा वयात १८ वर्षाची सुंदर पत्नी, ६ महिन्याचं गोंडस बाळ ह्यांना सोडून देश धर्मासाठी घराबाहेर पडणारे २१ वर्षीय सावरकर. आख्खी पिढीच अजब.
ह्या सगळ्यांचीच वयं जरी १५, १६ , २० असली तरी त्याची प्रोसेस काही वर्ष आधीच सुरू झाली असणार हे वेगळे सांगायलाच नको.
अशा कोणत्या मातीत ह्या व्यक्ती घडल्या असतील? नेमके कोणते संस्कार ह्यांच्या मनावर बिंबवले गेले असतील की अशा तेजस्वी विचारांची ही माणसं निर्माण होत होती?
आज अनेक शतकं उलटल्यानंतरही अशा महापुरूषांची आठवण झाली तरी शरीरावर रोमांच आल्याशिवाय राहत नाही, मान आदराने खाली झुकते, हात आपोआप जोडले जातात. मनातले भाव जागे होतात, डोळे पाणवतात,  एका वेगळ्याच आनंदाने मन अगदी भरून पावतं.
हे अशा प्रकारचे अनुभव आपल्यापैकी ब-याच जणांना कधीना कधीतरी आलेले असतात.
पण आता...
गेल्या काही दशकात ही परिस्थिती अगदीच बंद झाल्याचं जाणवतय. चांगली पीढी जन्माला येण्याचं संपलंय की काय अशी भीती निर्माण झाली आहे.  शाळकरी मुलं फक्त व्यसन आणि अश्लीलते कडे झुकलेली दिसते आहे.
ज्या वयात पुर्वी प्रतिभावान संत जन्माला येत होती त्या वयात आता वर्तमान काळात गावगुंड निर्माण होत आहेत. वय वर्ष १६ व्या मधील मुलं व्यभिचार आणि बलात्कारा सारख्या हिडीस प्रकारात पडलेले आढळतायत. दिल्लीतील चालत्या बस मधे घडलेला बलात्कार काय किंवा मुंबईच्या मिल परिसरातला बलात्कार काय! ही सगळी त्याचीच साक्ष. किशोरवयीन मुलं.. खुन, लफडी, मारामारीत आघाडीवर आहेत.  शाळेत शिकणा-या  विद्यार्थ्यांना हातात सिगारेट असणं अन् तोंडात शिव्या असणं आता अभिमानाचं झालंय
ही अशी पीढी उद्या प्रौढ होऊन कशी मुलं जन्माला घालतील आणि काय संस्कार करतील ह्याचा विचार न केलेलाच बरा.
आपले वैदिक ग्रंथ सांगतात की जर एक पिढी बरबाद झाली की पुढच्या पाच पिढ्या बरबाद होतात.
मग चांगला समाज निर्माण होणारच कसा?
इंग्रजांनी आमची गुरूकूल शिक्षण पध्दती बंद केली. आणि तिथूनच आपल्या राष्ट्रीची अधोगती सुरू झाली.
सर्वात आधी आम्ही आमची भाषा विसरलो. मातृभाषेची जागा कमकुवत इंग्रजी ने घेतली. मग हळुच सुरवात झाली ती आमचा जाज्वल्य इतिहास पुसण्याची.  जे जे वाईट ते ह्या मातीतलं आणि जे जे चांगलं ते फक्त परकीयांचं हे आमच्या मनावर बिंबवायला लागले. विमानाचा शोध आमचा नाही. आयुर्वेद आमचं नाही, अणुरेणु आम्हाला माहीत नाही, विज्ञान आम्हाला माहीत नाही, गुरूत्वाकर्षण, खगोलशास्त्र, भुशास्त्र, सर्जरी सगळं सगळं ह्यांच.
जर आमच्याकडे काहीच नव्हतं तर मग आमच्यावर गेली अनेक शतके इतकी आक्रमणं का?
आक्रमणं आधी आमच्या भाषेवर, मग इतिहासावर, मग सणांवर,  त्यानंतर देवदिकांवर आणि आता... देशावर. आमचा प्रत्येक सण, प्रत्येक दैवत ह्यांचं टार्गेट. ह्यातूनच जन्माला यायला लागली fxxk yaar, टच वुड बोलणारी आणि ईशवराला नाकारणारी असुरी पिढी. पाश्चात्य शिक्षण देणा-या विद्यापीठातून (?) तयार झाले कन्हैय्या सारखे अक्कलशुन्य देशद्रोही राक्षस. आमचे संस्कार बदलले, आदर्श बदलले. जिजाऊ, राणी पद्मिनी, आऊटडेटेड तर सनी लिओन, आलिया भट ह्या आत्ताच्या पिढीची आयडाॅल झाली. पाॅर्न पाहणारा सगळ्यात मोठा देश भारत झाला. कुंकू, टिकली, चुडा साडीतली आई माॅड मम्मा झाली. तीला जिन्स आणि लो बॅक टाॅप जास्त कनर्फटेबल वाटू लागला.
ह्या अधोगतीला सगळ्यात मोठा हातभार लावला तो ह्या सिनेसृष्टिने. हाताच्या बोटावर मोजणारे सिनेमे सोडले तर बाकी सगळेच "धन्यवाद" आहेत. पहिला आघात ह्या सिनेमांनी केला तो अभिजात संगीतावर, प्रत्येक गाणं खुदा, दुवा, मौला, इश्क, अल्ला, अशा परक्या उर्दु शिवाय पुरे होईनासे झाले. देवळं ही भ्रष्टाचारची केंद्र तर कबरी वरती चादर हे खुदा गाॅड कडे पोहचण्याचं माध्यम असं चित्र रंगवलं गेलं. आणि आता टार्गेट आहे नुकतीच वयात आलेली किशोरवयीन पिढी.
सध्याचे चित्रपट आम्हाला शिकवतात ब्ल्यु फिल्म पाहणं गैर नाही, प्रेमात पडणं म्हणजेच उदात्तीकरण, हातात सिगरेट आणि वाईनचा ग्लास असणं स्टेट्स सिंबाॅल आहे.  तुला बाॅयफ्रेंड  किंवा तुला गर्लफ्रेंड नसण हे अपमानास्पद आहे.
लहान वयातलं प्रेम दाखवले की मगच राष्ट्रपती पारितोषिक मिळवण्याचा मार्ग मोकळा होतो कि काय असा प्रश्न पडावा.
असे पारितोषिक जाहिर करून शासन नेमके कोणते संस्कार घडवतय समाजावर????
ह्या नॅशनल अॅवोर्ड चा नेमका हेतु काय? ह्यातून नेमके कोणते समाजकल्याण होणार आहे? किंवा आत्ताच्या पिढिचा कोणता उत्कर्ष, उन्नती होणार आहे. ह्या असल्या पारितोषिकांमुळे समाजात जाणारा संदेश हा योग्य आहे का?
की अशाच प्रकारचा समाज निर्माण होणं अपेक्षित आहे?
दोन पिढ्यांमधील फरक ठळकपणे जाणवतोय.
एक उत्कर्षाकडे जाणारी. आणि..
दुसरी अधोगतीकडे जाणारी.

संभ्रम...संभ्रम...आणि फक्त संभ्रम.
दोनच गोष्टी कळतायत
आपला देश विदेशी शिक्षणाचं इंधन भरून, टाॅप गिअर टाकून अधोगती कडे चाललाय...
आणि दुसरं समर्थ रामदासांचे शब्द २४ तास डोक्यात रेंगाळतायत, ते म्हणजे...
अखंड असावे सा..व..धा..न